Advertisement

महापालिकेला आली जाग, 'ना फेरीवाला क्षेत्र'चे लावले बॅनर!


महापालिकेला आली जाग, 'ना फेरीवाला क्षेत्र'चे लावले बॅनर!
SHARES

मनसेच्या फेरीवाले हटाव आंदोलनानंतर दादरसह जी उत्तर विभागातील सर्वच स्टेशनवर 150 मीटरची हद्द महापालिकेने आखून दिली आहे. पण तरीही मुजोर फेरीवाले पुन्हा अतिक्रमण करतील म्हणून जी उत्तर विभागातील महापालिका अधिकाऱ्यांनी 'हा फेरीवाला प्रतिबंधित विभाग आहे' हे दर्शविण्यासाठी बॅनर लावण्याची शक्कल लढवली आहे.


कुठे लावले बॅनर?

जी उत्तर विभागांतर्गत येणाऱ्या दादर, माहीम, माटुंगा, सायन या चार रेल्वे स्थानकांबाहेर हे सूचनेचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यापैकी 12 ते 13 बॅनर दादर रेल्वे स्थानकाबाहेर लावण्यात आल्याची माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभाग जी नॉर्थ कडून मिळाली आहे.


का लावले आहेत बॅनर?

150 मीटरची हद्द जरी आखून दिली असली, तरी काही फेरीवाले त्या विभागात अतिक्रमण करू शकतात. खरेदी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आहे हे कळावे, तसेच फेरीवाल्यांना हद्द कळावी, या हेतूने हे बॅनर लावण्यात आलेले आहेत.

7 नोव्हेंबर रोजी हे बॅनर जी उत्तर विभागात लावण्यात आल्याची माहिती जी उत्तर विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. त्याचबरोबर फेरीवाल्यांवर कारवाई करणे सोपे जाणार असल्याचे देखील यावेळी या अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा

एमआयएमचे वारीस पठाण विचारतायत 'मनसेनं मराठी माणसासाठी काय केलं?'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा