फेरीवाल्यांनी दिवसाढवळ्या कापले फुटपाथवरील रेलिंग !


  • फेरीवाल्यांनी दिवसाढवळ्या कापले फुटपाथवरील रेलिंग !
  • फेरीवाल्यांनी दिवसाढवळ्या कापले फुटपाथवरील रेलिंग !
SHARE

मागील बऱ्याच दिवसांपासून फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. हे फेरीवाले सर्व नियम धाब्यावर बसवत अनधिकृतरित्या आपले बस्तान मांडून आहेत. त्यातच आता मुलुंडमधील झवेरी रोड येथील भगवानदास अपार्टमेंट शेजारील फुटपाथवरील लोखंडी रेलिंग फेरीवाल्यांनी दिवसा ढवळ्या कापल्या. याचा पालिकेला थांगपत्ताच नव्हता.


7-2.jpg


भरदिवसा कापले रेलिंग

साधारण ४ दिवसांपूर्वी हे रेलिंग त्या फुटपाथवरील अनधिकृत डोसावाल्याने भरदिवसा कापले. हे लोखंडी रेलिंग कापतानाचा व्हिडीओ समोर येताच पालिका खडबडून जागे झाले आणि कारवाईला सुरुवात केली. पालिकेकडून मंगळवारी यासंदर्भात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


5-3.jpg

'नियम तोडाल, तर मनसैनिक विरोध करेलच'

या अनधिकृत फेरीवाल्यांना पालिका अधिकाऱ्यांचा जणू धाकच उरलेला नाही. त्यामुळेच या फेरीवाल्यांची एवढी हिम्मत वाढली आहे. आमच्या पक्षाला कोणाच्याही पोटावर पाय द्यायचा नाही. परंतु, तुम्ही नियम तोडून कारभार कराल तर, मनसैनिक याला विरोध करेलच. अशा शब्दांत प्रशासनावर टीका करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुलुंडचे विभागप्रमुख राजेश चव्हाण यांनी कारवाईची मागणी केली आहे.

यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, अशी माहिती मुलुंड टी. वॉर्डचे अतिरिक्त आयुक्त किशोर गांधी यांनी दिली आहे.हेही वाचा - 

फेरीवालामुक्त मुंबईसाठी 'मनसे शपथ'

फेरीवाला धोरणात ८० टक्के परवाने मराठी तरूणांनाच हवे - संदीप देशपांडे


संबंधित विषय
ताज्या बातम्या