Advertisement

पूजा चव्हाणप्रकरणी पोलिसांवर दबाव? देवेंद्र फडणवीस यांचा संशय

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव येत असून देखील त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

पूजा चव्हाणप्रकरणी पोलिसांवर दबाव? देवेंद्र फडणवीस यांचा संशय
SHARES

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव येत असून देखील त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन चौकशी होऊ शकत नाही. या प्रकरणातील सत्य कुठल्याही प्रकारे समोर आलंच पाहिजे. साेशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पोलिसांनीही ते सांगण्याची गरज आहे. पण पोलिसांकडून तथ्य लपवलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच पोलीस गुन्हा नोंदवण्यात चालढकल करत आहेत. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तपास पुढे सरकणार नाही. म्हणून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

एखाद्या मंत्र्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये अशा पद्धतीने विरोधकांनी आरोप करू नये, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केलं होतं. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घेतल्यास कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे हे लक्षात येईल. केवळ मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन चौकशी होऊ शकत नाही, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवलं.

हेही वाचा- तर लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, राजेश टोपेंचा इशारा

स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाच्या ११ ऑडिओ क्लिप्सही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील एका मंत्र्याचं नाव या प्रकरणात समोर आलं. भाजपकडून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आला असून त्याचा राजीनामा घेण्याची मागणी देखील होत आहे. त्यातच ८ दिवसांपासून संजय राठोड गायब असल्याने, भाजप (bjp) नेते अधिकच आक्रमक झाले आहेत.

त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राठोड कुठं आहेत? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी गृहखात्याचा मंत्री म्हणून सांगतो की, याप्रकरणी नियमानुसार चौकशी व कारवाई होणार आहे. जे काही सत्य असेल ते महाराष्ट्रासमोर येईल. एकदा संपूर्ण चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर, वस्तूस्थितीसमोर आल्यानंतर राज्य शासन त्यावर निर्णय घेईल. पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत. विरोधीपक्ष ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत, त्या आरोपात काही तथ्य नाही, असं अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी स्पष्ट केलं.

(maharashtra opposition leader devendra fadnavis demands to register fir against sanjay rathod in pooja chavan suicide case)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा