Advertisement

उपमुख्यमंत्र्यांची खर्ची रिकामीच? नेमकं काय झालं?

मुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अद्याप उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला नसल्याचं म्हटलं जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांची खर्ची रिकामीच? नेमकं काय झालं?
SHARES

भाजपने राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार अजित पवार यांना हाताशी घेऊन राज्यात शनिवारी सरकार स्थापन केलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला असला, तरी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अद्याप उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला नसल्याचं म्हटलं जात आहे.   

फडणवीस यांनी सोमवारी पदभार स्वीकारत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार ३८० कोटी रुपयांची मदत मंजूर केली. पण या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. त्यांची खुर्ची रिकामीच असल्याने ते कुठे गेले अशी चर्चा सुरू होती.

 

दरम्यान अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सोमवारी संध्याकाळपर्यंत सुरू होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, रामराजे निंबाळकर आणि जयंत पाटील या नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन ४ तास चर्चा केली. परंतु त्यातून काही निष्पण्ण झाल्याचं दिसलं नाही.     



हेही वाचा-

याचसाठी होता अट्टाहास.? सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना ‘क्लीन चीट’

महाविकास आघाडीचाही सत्तास्थापनेसाठी दावा, दिलं १६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा