Advertisement

उद्धव ठाकरेच नवे मुख्यमंत्री? शरद पवारांनी केला खुलासा

वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये सुरू असलेल्या या महाबैठकीत तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. या बैठकीतच सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याने ही बैठक कधी संपते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरेच नवे मुख्यमंत्री? शरद पवारांनी केला खुलासा
SHARES

राज्याला नव्या सरकारचा पर्याय देण्याच्या प्रयत्नात गुंतलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची सकाळी सुरू झालेली महाबैठक शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरूच होती. वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये सुरू झालेल्या या महाबैठकीत तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीतच सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याने ही बैठक कधी संपते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या बैठकीतून बाहेर पडल्यावर मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीची सर्व संमती झाली असून शनिवारी संयुक्त पत्रकार घेऊन तसं जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली.


या महाबैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यानुसार तिन्ही पक्षांचे नेते एकत्रितरित्या राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. 

या बैठकीत नव्या सरकारचं नेतृत्व कोण करेल? यावरही चर्चा सुरू होती. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी स्वीकारावी, अशी इच्छा शरद पवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. उद्धव यांचा त्यास नकार असल्यास ही जबाबदारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवावी, असंही ते म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान शुक्रवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना आमदारांशी संवाद साधला. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांची हॉटेल 'द ललित'मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच आमदारांना मुंबई आणि हॉटेलबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीने मित्रपक्षांची बैठक घेऊन त्यांना नव्या सरकारला पाठिंबा देण्यास राजी केलं.  



हेही वाचा-
नवं सरकार ६-८ महिनेच टिकेल, नितीन गडकरींचं भाकीत

मोठ्या शत्रूला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच शिवसेनेला जवळ- अबू आझमी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा