Advertisement

नवं सरकार ६-८ महिनेच टिकेल, नितीन गडकरींचं भाकीत

सरकार संधीसाधू असून ते ६ ते ८ महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही, असं भाकीत भाजप नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नवं सरकार ६-८ महिनेच टिकेल, नितीन गडकरींचं भाकीत
SHARES
Advertisement

राज्यात लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं नवं सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. अशातच हे सरकार संधीसाधू असून ते ६ ते ८ महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही, असं भाकीत भाजप नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. 

वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी म्हणाले की, शिवसेना आणि भाजपची युती सिद्धांत आणि विचारधारेच्या आधारावर होती. त्यामागे हिंदुत्वाचा विचार होता. भलेही दीर्घकाळ चाललेली ही युती तुटली असली, तरी दोघांमधील विचारधारा आजही समान आहे. याउलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसंच शिवसेनेची विचारधारा एकदम परस्परविरोधी आहे. तरीही संधीसाधू राजकारणासाठी ही आघाडी करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांमध्ये विचारधारेचं अंतर असल्याने हे सरकार फारकाळ टिकणार नाही.

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी असं म्हटलं जातं. त्यादृष्टीकोनातून महाराष्ट्रात स्थिर सरकार असणं अत्यंत आवश्यक आहे. अस्थिर सरकार गुंतवणुकीच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा समजला जातो. हे सरकार कोसळल्यावर मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं नुकसान होईल, असंही गडकरी यांनी सांगितलं.हेही वाचा-

मोठ्या शत्रूला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच शिवसेनेला जवळ- अबू आझमी

आता इंद्रपद दिलं, तरी माघार नाही- संजय राऊतसंबंधित विषय
Advertisement