Advertisement

Maharashtra Political Crisis: बंडखोर नेते एकनाथ शिंदे ईडीच्या कचाट्यात, संजय राऊत यांचा दावा

बंडखोर आमदारांप्रमाणे एकनाथ शिंदेही ईडीच्या कचाट्यात आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

Maharashtra Political Crisis: बंडखोर नेते एकनाथ शिंदे ईडीच्या कचाट्यात, संजय राऊत यांचा दावा
SHARES

शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे ईडीच्या कचाट्यात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. किमान 17-20 बंडखोर आमदार केंद्रीय तपास यंत्रणेच्या तपासाखाली असल्याचा दावाही त्यांनी केला. उर्वरित 10-15 आमदार ईडीच्या नोटीसमुळे घाबरले आहेत. झी न्यूजनं यासंदर्भातील वृत्त दिले आहे.  

राऊत म्हणाले, "माझ्याकडे माहिती आहे की बहुतांश बंडखोर आमदारांना ईडीच्या नोटिसा मिळाल्या आहेत. भाजप त्यांच्यावर ईडीच्या माध्यमातून दबाव आणत आहे. उर्वरित आमदारही तपास यंत्रणेच्या चौकशीत आहेत."

बंडखोर आमदारांप्रमाणे एकनाथ शिंदेही ईडीच्या कचाट्यात आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा राऊत म्हणाले, "हो, माझ्याकडेही तीच बातमी आहे."

शिवसेनेच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, "बंडखोर नेत्यांपैकी अनेकांनी ईडी कार्यालयात फेरफटका मारला आहे. त्यानंतर ते एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांना भेटत आहेत. ते टिकण्यासाठी भाजपशी हातमिळवणी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे."

महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीत शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का? राऊत म्हणाले, "आम्ही त्यांना मुंबईत येऊन बैठक घेण्याचे निमंत्रण दिले आहे. असे फोनवरही सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हवरही सांगितले. मात्र शिंदे आणि आमदार अद्याप मुंबईत आलेले नाहीत. काही बोलले नाही. ."

आपल्यासोबत ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी बुधवारी केला. ही संख्या आणखी वाढेल. मुख्यमंत्री उद्धव बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले आणि त्यांच्या घरी परतले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.



हेही वाचा

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांची फायनल यादी समोर, पहा नावे

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार : संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा