Advertisement

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांची फायनल यादी समोर, पहा नावे

शिवसेनेत आमदारांचे बंड घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांची फायनल यादी समोर, पहा नावे
SHARES

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याबाबत इतक्या गोंधळानंतरही स्पष्टता आलेली नव्हती. आता मात्र खुद्द शिंदे यांच्याकडूनच त्यांच्यासोबत असलेल्या यादीची घोषणा केली आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ आमदार असल्याचा दावा केला जात आहे तर 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार (Shiv Sena MLA With Eknath Shinde)

1) एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
2) अनिल बाबर (Anil Babar)
3) शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai)
4) महेश शिंदे (Mahesh Shinde)
5) शहाजी पाटील (Shahaji Patil)
6) महेंद्र थोरवे (Mahendra Thorve)
7) भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale)
8) महेंद्र दळवी (Mahendra Dalawi)
9) प्रकाश अबिटकर (Prakash Abitkar)
10) डॉ. बालाजी किणीकर (Balaji Kinikar)
11) ज्ञानराज चौगुले (Dyanraj Chaugule)
12) प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare)
13) तानाजी सावंत (Tanaji Sawant)
14) संदीपान भुमरे (sandipan Bhumare)
15) अब्दुल सत्तार नबी (Abdul Sattar)
16) प्रकाश सुर्वे (prakash surve)
17) बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar)
18) संजय शिरसाट (Sanjay Shirsat)
19) प्रदीप जयस्वाल (Pradip Jayswal)
20) संजय रायमुलकर (sanjay Raymulkar)
21) संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)
22) विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir)
23) शांताराम मोरे (Shantaram More)
24) श्रीनिवास वनगा (shrinivas Wanga)
25) किशोरअप्पा पाटील (Kishor Patil)
26) सुहास कांदे (Suhas Kande)
27) चिमणआबा पाटील (Chiman Aaba Patil)
28) सौ. लता सोनावणे (Lata Sonawane)
29) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)
30) सौ. यामिनी जाधव (Yamini Jadhav)
31) योगेश कदम (Yogesh Kadam)
32) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
33) मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar)
34) सदा सरवणकर (Sada Sarvankar)
35) दीपक केसरकर(Dipak Kesarkar)
36) दादा भुसे (Dada Bhuse)
37) संजय राठोड (sanjay Rathod)

अपक्ष आमदार

1) बच्चू कडू (Bachhu Kadu)
2) राजकुमार पटेल (Rajkumar Patel)
3) राजेंद्र यड्रावकर (Rejendra Yadraokar)
4) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
5) नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar)
6) किशोर जोरगेवार(Kishor Jorgewar)
7) सौ.मंजुळा गावित (Manjula Gavit)
8) विनोद अग्रवाल (Vinod Agrawal)
9) गीता जैन(Geeta jain)

शिवसेनेत आमदारांचे बंड घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 46 आमदार असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे आता आगामी दिवसात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे.

आज, मुंबईत 'वर्षा' बंगल्यावर शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे 13 आमदार उपस्थित आहेत. त्यापैकी आदित्य ठाकरे हे मातोश्री बंगल्यावरून आणि संतोष बांगर हे मतदारसंघातून ऑनलाइन पद्धतीने बैठकीसाठी उपस्थित आहेत.

उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी परतणार आहेत. असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गुवाहाटीतील २१ आमदारांचे सेनेशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. ते आमच्यासोबत आहेत, असे शिवसेनेने आज सांगितले. ताकदीची चाचणी झाली तर सर्वजण शिवसेनेला मतदान करतील, असेही ते म्हणाले. दुसरीकडे, बंडखोर आमदारांना संदेश आहे, मुंबईत परत या. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला.



हेही वाचा

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार : संजय राऊत

दादर-माहिमच्या स्थानिक शिवसैनिकांनी सदा सरवणकरांच्या फोटोला फासलं काळं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा