Advertisement

वर्षा बंगल्याच्या नूतनीकरणावर ‘इतका’ खर्च, पीडब्ल्यूडीने केला खुलासा

कोरोना संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकलं होतं.

वर्षा बंगल्याच्या नूतनीकरणावर ‘इतका’ खर्च, पीडब्ल्यूडीने केला खुलासा
SHARES

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या नूतनीकरण कामासाठी सुमारे ९२ लाख रुपयांची कामाची निविदा काढण्यात आली असून त्यावर ८९ लाख ९० हजार रुपयांचे काम आत्तापर्यंत करण्यात आलं आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. 

कोरोना संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारमधील काही मंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांच्या एकूण ३१ बंगल्यांच्या डागडुजीसाठी निविदा काढल्या होत्या. परंतु निविदा मंजूर होण्याआधीच बंगल्यांच्या डागडुजीला सुरुवात झाली. एवढंच नाही तर या बंगल्यांच्या कामापाेटी ९० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा देखील या वृत्तात करण्यात आला हाेता. 

त्यावर खुलासा करताना, काही माध्यमांमध्ये वर्षा निवासस्थानासाठी ३ कोटी २६ लाख रुपये खर्च झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. मात्र केवळ ९१ लाख ८७ हजार रुपयांच्या मर्यादेत काम होत आहे. मलबार हिलवरील वर्षा तसंच इतर मंत्र्यांचे बंगले हे खूपच जुने झाले आहेत. त्यासाठी या बंगल्याची आवश्यक ती दुरुस्ती व नूतनीकरण गरजेचं होतं, असं सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटलं आहे. 

हेही वाचा- बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्चाचा आकडा आला कुठून?- अजित पवार

त्याआधी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावलं होतं. 

मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी ९० कोटींचा निधी खर्च झाल्यासंदर्भातील वृत्त वस्तुस्थितीला धरुन नाही. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या निधीतून मंत्र्यांच्या बंगल्यांबरोबरच मंत्रालय, विधीमंडळ, न्यायालये, इतर शासकीय इमारती, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थानांच्या देखभाल दुरुस्ती केली जात असल्याने, केवळ मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च झाला असल्याचं म्हणणं, योग्य नाही, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी स्पष्ट केलं.

प्रसारमाध्यमांमध्ये जो दावा केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा आहे. या संदर्भात मी स्वत: माहिती घेतली आहे. तरीही काहीजण माहिती न घेताच चुकीच्या बातम्या देत आहेत. असा कुठलाही आकडा आमच्यापुढं आलेला नाही, मग हा ९० कोटी खर्चाचा आकडा आला कुठून?, असा सवाल देखील अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना उद्देशून केला. 

(maharashtra pwd clarifies over cm bungalow maintenance cost)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा