Advertisement

धक्कादायक! महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

धक्कादायक! महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण
SHARES
Advertisement

कोरोनाशी लढत असलेल्या महाराष्ट्रासाठी एक वाईट बातमी आहे. उद्धव ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जातंय. त्यांना उपचारासाठी नांदेडहून मुंबईत आणण्यात आलं आहे. अद्याप त्यांच्या नावाची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार, चव्हाण यांना कोरोनाव्हायरस त्यांच्या ड्रायव्हरपासून झाल्याचं समोर येतंय. उद्धव ठाकरे सरकारमधील हे दुसरे मंत्री आहेत जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय कॉग्रेसमधील ते ज्येष्ठ नेते आहेत.

एप्रिलच्या सुरुवातीस महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. न्यूमोनियाच्या तक्रारीमुळे ते ठाणे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या संपर्कात सुरक्षा कर्मचार्‍यांसह १८ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं. सुरुवातीला ते होम क्वारंटाईन होते त्यावेळी त्यांचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. 
संबंधित विषय
Advertisement