Advertisement

अदनान सामी यांना पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध

अदनाम सामीला पद्मश्री देण्याच्या निर्णयाला मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अदनान सामी यांना पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध
SHARES

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं प्रसिद्ध गायक-संगीतकार अदनान सामी यांना ‘पद्मश्री’ हा किताब जाहीर केला. मात्र, अदनान सामी यांच्या पद्मश्रीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) विरोध दर्शवला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे. २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे


'अदनामचा पुरस्कार रद्द करावा'

दुसऱ्या एका ट्विटमध्ये खोपकर म्हणाले की, मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारनं कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराला मनसेकडून तीव्र शब्दात निषेध आहे. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे.


अदनामनं मानले आभार

तर दुसरीकडे, अदनान सामी यानं पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सरकारनं सन्मान केल्याचा क्षण हा अभिमानाचा आहे. असं म्हणत, मोदी सरकारचं अदनाननं आभार व्यक्त केले आहेत.

सुरेश वाडकरांना पुरस्कार जाहीर

अदनामला पद्मश्री दिल्याचा एकिकडे विरोध करण्यात आला. तर दुसरीकडे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल मनसेकडून शुभेच्छा देण्यात आल्या. सुरेश वाडकरांनी आजपर्यंत हिंदी-मराठी- भोजपुरी- कोकणी- ओडिया अशा अनेक भाषांमधील गाणी गायली आणि ती लोकप्रियही झाली. 'मेघा रे मेघा रे', 'चप्पा चप्पा चरखा चले', 'ए जिंदगी' यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली

यांना पुरस्कार जाहीर

कला क्षेत्रातून  कंगना राणावतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या आधी कंगनाने तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. कंगना रानावत सोबत चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर, बालाजी टेलिफिल्मच्या निमित्या आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची कन्या एकता कपूर हिलाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 'बीजमाता' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.



हेही वाचा

माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो… राज ठाकरे हिंदुत्वाच्या ट्रॅकवर

शिवभोजन योजनेसाठी ६.४८ कोटीचे अनुदान

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा