Advertisement

“आधी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा पैसा आणा”

भाजप नेत्यांना कर्ज काढणं हे पाप नाही, परंतु राज्याचा जीएसटीचा हक्काचा पैसा न देणं हे निश्चितच पाप आहे, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादीने सुनावलं आहे.

“आधी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा पैसा आणा”
SHARES

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, या मागणीवरुन सत्ताधारी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी गरज पडल्यास कर्ज काढा, असा सल्ला देणाऱ्या भाजप नेत्यांना कर्ज काढणं हे पाप नाही, परंतु राज्याचा जीएसटीचा हक्काचा पैसा न देणं हे निश्चितच पाप आहे, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादीने सुनावलं आहे. (maharashtra revenue minister balasaheb thorat slams bjp government over gst return)

जीएसटीचा पैसा हा राज्य शासनाच्या हक्काचा पैसा आहे. केंद्र सरकारला सर्वाधिक कर हा महाराष्ट्रातूनच जातो. जीएसटीच्या परताव्यापोटी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ३० हजार कोटी रुपये येणं बाकी आहे. दुर्दैवाने केंद्र सरकार ही रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. एका बाजूला राज्य सरकार खर्चासाठी कर्ज काढत आहे, तर दुसऱ्या बाजूला जे हक्काचे पैसे आहेत, ते मिळत नाहीत, असा आरोप राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. 

हेही वाचा - केंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय?- उद्धव ठाकरे

तर सरकारवर टीका करताना भाजपचे नेते केवळ यांना नुकसान भरपाई द्या त्यांना आर्थिक मदत करा, अशा मागण्या करत आहेत. त्यामुळे पोकळ गप्पा मारण्याऐवजी त्यांनी केंद्राकडून महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही त्यांचं कौतुकच करू. सरकारी नोकरदारांचा पगार, इतर खर्चासाठी कोरोनाच्या काळात आतापर्यंत राज्य सरकारला ५५ हजार कोटी रुपयांचं कर्ज काढावं लागलेलं आहे. हळुहळू अर्थचक्राला गती आल्यास महसूल वाढून परिस्थिती बदलू शकते, अशी अपेक्षाही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. 

तर दुसरीकडे कर्ज काढणं हे पाप नाही. परंतु राज्याचा जीएसटीचा हक्काचा २८ हजार कोटीचा परतावा राज्याला न देणं हे निश्चितच पाप आहे. हक्काचा परतावा राज्याला परत मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तुम्ही प्रयत्न करणार का? आणि केले का? पाप आणि पुण्याची परिभाषा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना समजावू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी फडणवीसांना सुनावलं आहे.

हेही वाचा - राज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवणं एवढंच पवारांचं काम- देवेंद्र फडणवीस


Read this story in English
संबंधित विषय