Advertisement

राज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवणं एवढंच पवारांचं काम- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारचा नाकर्तेपणा लोकांसमोर आला असून तो लपवणं हेच आता शरद पवारांचं काम उरलं आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

राज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवणं एवढंच पवारांचं काम- देवेंद्र फडणवीस
SHARES

अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना मदत मिळवून देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून काम का करतात? याचा खुलासा करत आहेत. खरं तर राज्य सरकारचा नाकर्तेपणा लोकांसमोर आला असून तो लपवणं हेच आता शरद पवारांचं काम उरलं आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. (opposition leader devendra fadnavis slams sharad pawar and cm uddhav thackeray over flood in maharashtra)

बारामतीमधील उंडवडी गावातील पहाणी करण्यासाठी गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी अत्यंत गंभीर परिस्थितीत असताना ठाकरे सरकार एखाद्या वाक्यावरून राज्यपालांशी वादविवाद करत बसलं आहे. याआधीही अनेकदा सरकारचे राज्यपालांसोबत वाद झाले आहेत. परंतु ही वाद करण्याची वेळ नसून राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.  शेतकऱ्याला टोलवाटोलवी नको आहे. सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे राेज सरकारचा बचाव करणं एवढंच काम आता पवारांकडे असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हेही वाचा- मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? शरद पवारांनी सांगितलं कारण…

कोणतंही संकट आलं की त्याची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकायची आणि नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण अयोग्य आहे. पंचनामे वगैरे याच्या भानगडीत न पडता सरकारने तातडीने मदत जाहीर केली पाहिजे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. केंद्र सरकार मदत देईलच, पण राज्य सरकारने जबाबदारी झटकून कसं चालेल? पूरस्थितीत मदत देण्याची पहिली जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. पुराचं संकट राज्यावर आलं तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन आम्ही सर्वतोपरी मदत करु असं आश्वासन दिल्याची माहिती देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत, या प्रश्नावर उत्तर देताना प्रशासनाची जबाबदारी ज्यांच्या हातात असते, त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागतं. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मुंबईतच बसून सर्व जिल्ह्यांच्या संपर्कात राहून निर्णय घ्यावेत, अशी विनंती आम्ही केली होती. आमच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्वीकारली. तर आम्ही सर्वजण राज्यात फिरून त्यांना परिस्थितीची माहिती देत असतो, असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा