Advertisement

महिलांच्या लोकल प्रवासासाठी भाजप घंटानाद का करत नाही?- सचिन सावंत

मंदिर उघडा म्हणून ओरडणारे भाजप नेते महिलांच्या लोकल प्रवासावर गप्प का? ते घंटानाद का करत नाहीत, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारत आहोत, असं सचिन सावंत म्हणाले.

महिलांच्या लोकल प्रवासासाठी भाजप घंटानाद का करत नाही?- सचिन सावंत
SHARES

मंदिरं उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपाला मायभगिनींकरिता लोकल चालू व्हावी व नवरात्रीत त्यांची सोय होईल याची तमा नाही. भाजपाचा आवाज बंद का? आता भाजप घंटानाद का करत नाही? रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर द्यावं, नवरात्रीत मायभगिनींना लाभ झाला नसता का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. (congress leader sachin sawant criticised bjp and railway board over mumbai local train facility to women passengers)

महिलांसाठी लोकल सुरू करण्याच्या प्रश्नावरून भाजपवर टीका करताना सचिन सावंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने रेल्वे प्रशासनाला कळवलेलं आहे की, १७ आॅक्टोबरपासून मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. कोविड संदर्भातील नियमांचं पालन करून, योग्य तिकीटाच्या आधारे सकाळी ११ ते ३ आणि संध्याकाळी ७ वाजेनंतर या महिलांना प्रवेशास मुभा द्यावी. यावेळी रेल्वेमध्ये गर्दी नसते. असं असतानाही रेल्वेचे अधिकारी ज्या पद्धतीने ही परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. यासाठी रेल्वे बोर्डाची बैठक घ्यावी लागेल, त्यानंतरच हा निर्णय घेण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगणं अत्यंत दुर्दैवी आहे, असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं. 

हेही वाचा - महिला प्रवासी अद्याप लोकल सेवेच्या प्रतीक्षेत

खरं तर हा निर्णय राज्य सरकारचे अधिकारी, मुख्य सचिव, महापालिका अधिकारी, पोलीस प्रशासनाने मिळून रेल्वे अधिकाऱ्यांसोबत आधीच घेतला होता. नवरात्रीत महिलांना लोकलची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आधीच ठरवण्यात आलं होतं, तर यासंबंधीची परवानगी रेल्वे बोर्डाकडून आधीच का घेतली नाही, याचं उत्तर रेल्वेच्या सीपीएम यांना विचारण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही याचं उत्तर द्यावं. खरं तर हे रेल्वे अधिकारी आपल्या अधिकारक्षेत्रातही हा निर्णय घेऊ शकतात. मंदिर उघडा म्हणून ओरडणारे भाजप नेते महिलांच्या लोकल प्रवासावर गप्प का? ते घंटानाद का करत नाहीत, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारत आहोत, असं सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान यावर, रेल्वे तयारीत आहे. आज आम्ही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी  चर्चा केली. आत , राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कार्यपद्धती निश्चित करून रेल्वेला सांगावं, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा