Advertisement

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. खुद्द वर्षा गायकवाड यांनी कोरोना झाल्याची माहिती ट्विटरवर दिली.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

महाराष्ट्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. खुद्द वर्षा गायकवाड यांनी कोरोना झाल्याची माहिती ट्विटरवर दिली. मंगळवारी ट्विट करत त्यांनी सांगितलं की, COVID 19 साठी माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण सध्या माझी प्रकृती चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी.

“आज माझ्या तपासणी दरम्यान मी कोरोनाव्हायरससाठी सकारात्मक चाचणी केली आहे. सर्वांचा आशीर्वाद पाठिशी आहे. त्यामुळे माझी प्रकती ठिक आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं सावधगिरी बाळगत चाचणी करावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या., असं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलं.

काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड या मुंबईतील धारावी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. एका आठवड्यात कोरोनव्हायरससाठी सकारात्मक चाचणी घेणार्‍या उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील त्या तिसऱ्या मंत्री आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी ही चिंताजनक बाब आहे.

आतापर्यंत, महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील १२ कॅबिनेट मंत्र्यांनी कोरोनाव्हायरससाठी सकारात्मक चाचणी केली आहे. नऊ जण त्यातून बरे झाले आहेत.

नुकतेच, महाराष्ट्रातील जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं. यासोबतच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचीही कोरोनाची पॉझिटिव्ह चाचणी आली.

तत्पूर्वी उद्धव ठाकरे सरकारनं जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, बाळासाहेब पाटील, सुनील केदार, अब्दुल सत्तार आणि विश्वजित कदम यांना देखील कोरोना झाला होता. पण हे सर्व मंत्री बरे होऊन घरी परतले.

२१ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाव्हायरसचे प्रमाण १२ लाख २४ हजार ३८० वर पोहोचले आहे. मृतांचा आकडा, ३३ हजार ०१५ वर पोहोचला आहे. राज्यात सक्रीय रुग्ण २ लाख ७४ हजार ६२३ इतके आहेत. तर COVID 19 पासून जवळजवळ ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी, महाराष्ट्रात २४ तासांत १५ हजार ७३८ इतके रुग्ण आढळले आहेत.हेही वाचा

मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारचे ८ मोठे निर्णय

शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष- देवेंद्र फडणवीस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement