Advertisement

शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष- देवेंद्र फडणवीस

शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही, असं म्हणत कृषी विधेयकासंदर्भात लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फटकारलं आहे.

शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष- देवेंद्र फडणवीस
SHARES

शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात. आमच्यासोबतसुद्धा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या. त्यांना आधी भूमिका घ्यावी लागेल. शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही, असं म्हणत कृषी विधेयकासंदर्भात लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फटकारलं आहे. (opposition leader devendra fadnavis slams shiv sena over farm bill in parliament)

कृषी विधेयकाचा विरोध करणाऱ्यांना टोला हाणताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुळात शेतकर्‍यांचा या विधेयकांना विरोध नाही. त्यांनी तर स्वागतच केलं आहे. काही नेते केवळ आपली दुकानदारी चालविण्यासाठी याचा विरोध करीत आहेत. हा मुद्दा आमच्यासाठी राजकारणाचा नाही. शेतकर्‍यांचं शोषण थांबविणं, याला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यावर गेल्या १० वर्षांपासून सकारात्मक चर्चा झाली आहे. पण, सध्या केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे.

हेही वाचा- “संजय राऊत ९९ टक्के शिवसैनिकांना खटकतात”

या विधेयकातील कंत्राटी शेतीसंदर्भातील तरतुदींमुळे शेतकर्‍यांच्या जमिनीची मालकी सुरक्षित राहील. अधिक नफा झाला, तर त्यातील वाटा शेतकर्‍याला द्यावा लागेल. कंत्राटी शेतीसंदर्भात २००६ मध्ये महाराष्ट्रात आघाडी सरकारने कायदा केला. त्याचा फायदा महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे आता त्यालाच संसदेत विरोध ही शुद्ध लबाडी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

डॉ. स्वामिनाथन आयोगाने अशाच प्रकारच्या शिफारसी केल्या होत्या. नीती आयोगाने शेती सुधारणांसाठी माझ्या अध्यक्षतेत मुख्यमंत्र्यांचा एक टास्क फोर्स गठीत केला होता. मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री कमलनाथ, कर्नाटकचे तत्कालिन मुख्यमंत्री हे या टास्कफोर्समध्ये होते. तेव्हा सर्वांनी हीच मागणी केली होती. या कायद्यांमुळे आता शेतकर्‍यांना एमएसपी मिळणार नाही, असा अपप्रचार केला जात आहे. पण, एमएसपी कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे. 

शेतकर्‍यांबद्दल काँग्रेस आणि या विधेयकांना विरोध करणारे पक्ष केवळ राजकारण करीत आहेत. शेतकर्‍यांची दिशाभूल करीत आहेत. २०१९ च्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सुद्धा याच सार्‍यांचं आश्वासन देण्यात आलं होते. आता केवळ राजकारणासाठी विरोध केला जात आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

हेही वाचा- शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस, म्हणाले आमच्यावर विशेष प्रेम…


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा