Advertisement

“संजय राऊत ९९ टक्के शिवसैनिकांना खटकतात”

भाजप नेते निलेश राणे यांनी हाच मुद्दा पकडून शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

“संजय राऊत ९९ टक्के शिवसैनिकांना खटकतात”
SHARES

कृषी विधेयकासंदर्भात शिवसेनेने लोकसभेत वेगळी आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतल्याने शिवसेनेवर चोहोबाजूंनी टीका सुरू आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी हाच मुद्दा पकडून शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. (bjp leader nilesh rane slams shiv sena mp sanjay raut over farm bill in Parliament)

आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन आणि राज्यसभेत विरोध. याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेतील खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाही व नेता मानत नाही. संजय राऊत ९९% शिवसैनिकांना खटकतो. म्हणून संधी मिळेल तेव्हा ते त्यांच्या विरोधात भूमिका घेतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला, असं म्हणत निलेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला होणला आहे.

हेही वाचा - समाजात तणाव निर्माण होऊ न देणं हे विरोधकांचही कर्तव्य- संजय राऊत

शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात. आमच्यासोबतसुद्धा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या. त्यांना आधी भूमिका घ्यावी लागेल. शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही, असं म्हणत कृषी विधेयकावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या गोंधळाच्या भूमिकेवर टीका केली होती. 

मुळात शेतकर्‍यांचा या विधेयकांना विरोध नाही. त्यांनी तर स्वागतच केलं आहे. काही नेते केवळ आपली दुकानदारी चालविण्यासाठी याचा विरोध करीत आहेत. हा मुद्दा आमच्यासाठी राजकारणाचा नाही. शेतकर्‍यांचे शोषण थांबविणे, याला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यावर गेल्या १० वर्षांपासून सकारात्मक चर्चा झाली आहे. पण, सध्या केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा