Advertisement

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, एक जण जखमी

शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, एक जण जखमी
SHARES

उदय सामंतांच्या गाडीवर कात्रज चौकात हल्ला केला आहे. शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. पुण्याच्या कात्रज परिसररात ही घटना घडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  पुणे दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदे हे पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी  ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांचा गाडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

उदय सामंतांच्या गाडीचा ताफा त्यांनी बघितला आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याचं बोललं जातंय. त्यांचा गाडीवर दगडफेक केली आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पुण्यातील कात्रज चौकात आदित्य ठाकरे यांची सभा होती. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. त्याचवेळी एकनाथ शिंदे देखील जवळच्या शंकर महाराज मठात होते.

दरम्यान, शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर  3 तारखेला सुप्रीम कोर्टात प्रकरणावर सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाशी संबंधित प्रश्नावर सुनावणी न घेण्याची विनंती एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सुनावणीच्या एक दिवसा आधी दोघेही आमने-सामने आले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा