Advertisement

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना १०० कोटी देणार- धनंजय मुंडे

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात १०० कोटी रूपये मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना १०० कोटी देणार- धनंजय मुंडे
SHARES

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात १०० कोटी रूपये मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून त्यातील १३३ नवउद्योजकांना ८ दिवसांत १२.९८ कोटींचा मार्जिन मनी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. (maharashtra social justice department will provide margin money for new businessman from schedule caste says minister dhananjay munde)

मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील १३३ नवउद्योजकांना मार्जिन मनी मिळण्याबाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योजक यांच्यासाठी असलेल्या योजनांबाबत आढावा बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, लीडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गेडाम, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, संतोष कांबळे, रवी घाटे, डिक्कीचे सदस्य, अनेक लघुउद्योगाचे प्रतिनिधी व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- केंद्राच्या पॅकेजमधून मिळावी उद्योगांना आर्थिक मदत - धनंजय मुंडे

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना कोणत्या प्रकाराचं लघुउद्योग सुरू करता येतील त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणं, आर्थिक सहाय्य यांचा कृतीआराखडा तयार करण्यासाठी विभागाचे सचिव, समाजकल्याण आयुक्त, डिक्कीचे प्रतिनिधी, लीडकॉमचे प्रतिनिधी तसंच बँकर्स यांची संयुक्त समिती स्थापन केली आहे. समिती कृती आराखडा तयार करून पुढील बैठकीत अहवाल सादर करेल. जिथं कच्चा माल उपलब्ध असेल तिथं त्याचं उत्पादन करून मोठ्या महानगरात बाजारपेठ उपलब्ध करणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबतही प्रयत्न केला जाईल, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

१५ लाख ते २० लाख रुपयांपर्यंतचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी १५ टक्के मार्जिन मनी वितरीत करण्यात येईल. तालुकास्तरावर नवउद्योजकांमार्फत सेवा व उत्पादन पुरविणारी साखळी निर्माण करून त्यातूनच हे नवउद्योजक तयार करणार आहे, डिक्कीच्या सहकार्याने अनुसूचित जातीसाठी आर्थिक विकासाच्या योजना राबवण्यात येऊन अनुसूचित जाती चा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसंच डिक्की व लीडकॉम यांच्या सहकार्याने चर्मोद्योगाला चालना देणार आहे. स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना लवकरच विशेष आर्थिक पॅकेज देणार असल्याचंही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

या बैठकीत नोगा, एमएआयडीसी, बीव्हीजी, अ स्टोर, लीडकॉम शॉपी, ले धारावी या लघुउद्योग कंपन्यांनी आपलं सादरीकरण सादर केलं.

हेही वाचा- खुशखबर! सफाई कर्मचा-यांसाठी १६ हजार घरे देणार - धनंजय मुंडे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा