आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट, गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न?

राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.

SHARE

राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. आदित्य यांची ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे. तरी या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा सण साजरा होत असताना आदित्य यांनी राहुल यांची घेतलेली भेट म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसच्या संबंधांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा- जुनी मढी उकरू नका, वादग्रस्त पुस्तकावरून शिवसेनेचं नमतं

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचं आमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य आणि राहुल यांची ही पहिलीच भेट आहे. 

आदित्य ठाकरे गेल्या २ दिवसांपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा- झोपडपट्टीधारकांना ५०० चौ.फूट घर द्या- अस्लम शेख

संबंधित विषय
ताज्या बातम्या