Advertisement

विधानसभा अध्यक्ष घेणार वांद्रे शासकीय वसाहतीची भेट, पुनर्विकासावर करणार चर्चा

वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

विधानसभा अध्यक्ष घेणार वांद्रे शासकीय वसाहतीची भेट, पुनर्विकासावर करणार चर्चा
SHARES

वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासासंदर्भात पूर्ततेसाठी लवकरच सर्व संबंधितांसह वसाहतीस प्रत्यक्ष भेट देणार असल्याचं देखील नाना पटोले यांनी सांगितलं.

वांद्रे (bandra) येथील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्यांसंदर्भात उपाययोजना करण्याकरिता विधानभवन इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीत रहिवाशांना भेडसावत असलेल्या समस्या, दुरूस्तीकार्य, पुनर्विकास या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के.टी.पाटील, सहायक अभियंता यु.डी. पालवे आणि दिघावकर, सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सोमनाथ बागुल, कक्ष अधिकारी रा. मु.वडनेरकर, गव्हर्नमेंट क्वार्टर रेसिडेन्ट असोसिएशनचे अरूण गिते, प्रमोद शेलार, अशोक चव्हाण (चतुर्थ श्रेणी) यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- महाराष्ट्रात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम

मुंबईतील (mumbai) वांद्रे पूर्वेकडील शासकीय निवासी वसाहतीचे बांधकाम ७० वर्षे जुने असल्याने निवासी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. निवासी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसंदर्भातील मोडकळीस आलेलं बांधकाम, पिण्याच्या पाण्याची दुरावस्था, वसाहतीत होत असलेलं अनधिकृत बांधकाम, समाजमंदिर सभागृह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कौंटुबिक कार्यक्रमासाठी वापरास उपलब्ध न होणं, उपलब्ध झाल्यास अवाजवी भाडे आकारण्यात येणे, अशा विविध समस्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जाणून घेतल्या.

ठाणे अथवा नवी मुंबई इथं कार्यालयीन बदली झाल्यास शासकीय निवासस्थान सोडावं लागणं आणि शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर तातडीने निवासस्थान सोडताना पाल्यांच्या शैक्षणिक वर्षाचा विचार व्हावा या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

(maharashtra vidhan sabha president nana patole to visit bandra government colony redevelopment plan)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा