Advertisement

महाराष्ट्रला ८ नवे सीएनजी स्टेशन

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी आयोजित कार्यक्रमात व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सर्व ४२ सीएनजी आणि ३ सिटी गेट स्टेशन्स जोडली.

महाराष्ट्रला ८ नवे सीएनजी स्टेशन
SHARES

केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पर्यावरणपूरक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची व्यापकता वाढविण्याच्या उद्देशाने देशभर ४२ सीएनजी आणि टोरेंट गॅसच्या ३ सिटी गेट स्टेशन्सचं लोकार्पण करण्यात आलं. यापैकी ८ महाराष्ट्रामध्ये आहेत. (maharashtra will get new CNG stations from petroleum ministry)

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी आयोजित कार्यक्रमात व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सर्व ४२ सीएनजी आणि ३ सिटी गेट स्टेशन्स जोडली. या कार्यक्रमात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातील वितरक ज्यांना सीएनजी आणि सिटी गॅस स्टेशन प्राप्त झालेली आहेत ते उपस्थित होते.

हेही वाचा- बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार ५०० सीएनजी बस

जोडलेल्या ४२ सीएनजी स्टेशन्समध्ये १४ उत्तरप्रदेश, ८ महाराष्ट्र, ६ गुजरात, ४ पंजाब आणि ५-५ तेंलगाना आणि राजस्थान इथं आहेत. सात राज्य, १ केंद्र शासित प्रदेशातील एकूण ३२ जिल्ह्यांमध्ये टोरेंट गॅसला सिटी गॅस वितरण नेटवर्क पसरविण्याचे अधिकार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये एक-एक सिटी स्टेशन आहे.

सध्या केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील वाहने सीएनजीवर चालण्यास प्रोत्साहीत होत आहेत. त्या अनुषंगाने सीएनजी पंपाचं जाळं वाढवण्यासाठी हा निर्णय उपयोगी पडू शकेल. सध्या बहुतेक ठिकाणी सीएनजी पंप नसल्याने वाहनमालक आपले वाहन सीएनजीवर रुपांतरीत करून घेण्यास कचरत आहेत. सीएनजी पंपांची संख्या वाढल्यास सीएनजी वाहनांची संख्या देखील वाढू शकेल. यामुळे प्रदूषणाची होणारी मोठी हानी टाळता येईल. 

हेही वाचा- सीएनजीच्या दरात वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडे वाढवण्याची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा