Advertisement

हिवाळी अधिवेशन : RTPCR चाचणीत ८ पोलिसांसह १० जण करोना पॉझिटिव्ह

हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८ पोलीस कर्मचाऱ्यांसह १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हिवाळी अधिवेशन : RTPCR चाचणीत ८ पोलिसांसह १० जण करोना पॉझिटिव्ह
SHARES

महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८ पोलीस कर्मचाऱ्यांसह १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाबाधित १० जणांमध्ये २ जण हे विधानभवनातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जवळपास ३ हजारांहून अधिक लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मात्र, त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तत्पूर्वी, मंगळवारी राज्यात ८२५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर ११ जण ओमिक्रॉनबाधित होते. तर करोनाबाधित १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

राज्यात मंगळवारी १४ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. दिवसभरात ७९२ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ८२५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ९८ हजार ८०७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासलेल्या ६ कोटी ७८ लाख ८३ हजार ६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ५० हजार ९६५ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे प्रमाण ९.८ टक्के इतके आहे.

राज्यात एकूण ७ हजार १११ करोना बाधित रुग्ण उपचाराधीन आहेत. तर ७३ हजार ५३ व्यक्ती गृह विलगीकरणात असून, ८६४ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. मुंबई महापालिकेच्या हद्दीत मंगळवारी ३१२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. यामुळे मुंबईत आजपर्यंतच्या करोना रुग्णांची एकूण संख्या सात लाख ६७ हजार ५५३ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आजतागायत करोनामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण मृत्युसंख्या १६ हजार ३६६ इतकी आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा