Advertisement

शिवाजी पार्कवर लता दिदींच स्मृतीस्थळ उभारा; भाजप आमदार राम कदमांची मागणी

शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार झाल्यानंतर याठिकाणी लता मंगेशकर यांचे स्मृतीस्थळ उभारा अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

शिवाजी पार्कवर लता दिदींच स्मृतीस्थळ उभारा; भाजप आमदार राम कदमांची मागणी
SHARES

भारतरत्न व भारताच्या गानकोकीळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार झाल्यानंतर याठिकाणी लता मंगेशकर यांचे स्मृतीस्थळ उभारा अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

''माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी स्वर्गीय लतादीदींचे अंत्यसंस्कार झाले  त्या शिवाजी पार्कमध्ये स्वर्गीय लतादीदींचे स्मृतीस्थळ बनवावे ही मागणी  संपूर्ण देशाची नव्हे तर जगातील कोट्यावधी संगीत प्रेमी अन लता दीदीच्या चाहत्यांची आहे'', असं राम कदम यांनी म्हटलं.

कोरोनाचा संसर्ग झाल्याने लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सौम्य लक्षणे होती. परंतु हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. मात्र या आठवड्यात पुन्हा त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते.

शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आणि अवयव निकामी झाल्यामुळे रविवारी सकाळी ८:१५ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा