Advertisement

‘स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक करा’


‘स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक करा’
SHARES

मुंबई - मोदींनी अचानक नोटा बदलून लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. तसेच अचानक नोटा रद्द केल्याचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलंय. हिंमत असेल तर स्विस बॅंकेवर कारवाई करा, स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राइक कधी करणार असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय. काळा पैसा बाहेर यायला हवा या बद्दल दुमत नाही मात्र अचानक नोटा रद्द केल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. नागरिकांना होणारा त्रास थांबवा, नागरिकांना होणारा त्रास थांबवा, नोटा बदलण्याची मुदत वाढवा, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. जनतेनं जर सर्जिकल स्ट्राइक केला तर भारी पडेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिलाय. शुक्रवारी उद्धव यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मोदींच्या या निर्णयावर आक्षेप घेत हे टीकास्त्र सोडलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा