Advertisement

युतीबाबत संभ्रम कायम?


युतीबाबत संभ्रम कायम?
SHARES

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच 45 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. मात्र शिवसेना-भाजपामध्ये ज्या प्रकारे एकमेकांवर टीका सुरू आहे. त्यामुळे युती होणार की नाही याबात संभ्रम निर्माण झाला आहे. पण भाजपाने 110 जागा मागितल्या आहेत असं प्रसार माध्यमांमध्ये जाणूनबुजून पसरवलं जात आहे, असा दावा शिवसेनेच्या सूत्रांकडून केला जात आहे. मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा-शिवसेनेमध्ये युती झाली होती. भाजपाला तेव्हा 67 जागा देण्यात आल्या होत्या. मात्र सध्या भाजपा राज्यात आणि केंद्रात सत्तेत असल्याने त्यांच्या जागांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र नोटाबंदी आणि राज्यातील भाजपा नेत्यांवर झालेल्या भ्रष्ट्राचारांच्या आरोपांमुळे भाजपाची राज्यात आणि मुंबईत नाचक्की झाल्याची टीका शिवसेनेचे नेते करत आहेत, त्यामुळे कोणत्या आधारावर भाजपा 110 जागा मागत असल्याचं प्रसिद्धी माध्यमात पसरवली जात आहे. असा प्रश्न शिवसेना नेत्याने विचारला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा