Advertisement

रावसाहेब दानवेंवर कारवाई करा - नवाब मलिक


रावसाहेब दानवेंवर कारवाई करा - नवाब मलिक
SHARES

मुंबई - नगरपालिका निवडणुकीत मतदारांना पैशाचं आमिष दाखवणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर कठोर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलीय. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांची भेट घेऊन नवाब मलिक यांनी याबाबतचे पत्र त्यांना दिलं. रावसाहेब दानवे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पैठण येथील सभेत मतदारांनी 'लक्ष्मी दर्शन करावे' असं वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसचे मतदारांना दारू वाटण्यासाठी भाजपाचे आमदार पास्कल धानोरा यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे दारूची मागणीही केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा