Advertisement

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २ दिवसाच्या दौऱ्यासाठी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होत आहेत.

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार
SHARES

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २ दिवसाच्या दौऱ्यासाठी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होत आहेत. या दौऱ्यात बॅनर्जी या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार असल्याची माहिती मिळते.

मुंबई दौऱ्यावर असताना त्या बुधवार १ डिसेंबर रोजी उद्योग जगतातील मान्यवरांशी चर्चा करणार असल्याचं समजतं. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात बंगालमध्ये जागतिक व्यापार परिषद भरविण्यात येणार आहे. या परिषदेत अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहेत.

मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यालाही उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बुधवारी मुंबईतील उद्योगपतींशी भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन गुरुवारी कोलकात्याला परतणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा