Advertisement

मनसेच्या बालेकिल्ल्यात नव्या शिलेदाराची निवड

कल्याण-डोंबिवली या मनसेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याची चर्चा सुरू असतानाच अवघ्या २४ तासांत राज ठाकरेंनी डोंबिवलीत नव्या शिलेदाराची निवड केली आहे.

मनसेच्या बालेकिल्ल्यात नव्या शिलेदाराची निवड
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या विश्वासातील दोन नेत्यांनी पक्षाला सोमवारी अचानक सोडचिठ्ठी दिली. यामुळे कल्याण-डोंबिवली या मनसेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याची चर्चा सुरू असतानाच अवघ्या २४ तासांत राज ठाकरेंनी डोंबिवलीत नव्या शिलेदाराची निवड केली आहे.

डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष तसंच प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेला डोंबिवलीत जबर धक्का बसला होता.

त्यांच्या पाठोपाठ मंगळवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते मंदार हळबे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (bjp) प्रवेश केला. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण या मतदारसंघातील हे सर्व पदाधिकारी होते. कल्याण-डोंबिवलीत मनसेचा जनाधार वाढवण्यात या दोन्ही नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती.

हेही वाचा-  राज ठाकरेंची साथ सोडली ‘या’ नेत्यानं, व्हायरल होतोय शेवटचा मेसेज

मात्र एकापाठोपाठ एक दोघांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राजू पाटील यांनी त्वरीत कृष्णकुंजकडे धाव घेतली. यातील गांभीर्य ओळखून राज ठाकरे यांनी देखील ताबडतोब निर्णय घेऊन नवीन शहराध्यक्षांची निवड केली आहे.

मनोज घरत यांची पक्षाकडून डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी वर्षभरासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (mns) ध्येय धोरणे व कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या विभागात निष्ठेने राबवावी. यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही. आपण व आपल्या सहकाऱ्यांकडून जनतेला कोणताही उपद्रव होणार नाही, अशा प्रकारचं आपलं वर्तन असेल, हीच अपेक्षा.

मराठी बांधवांना, भगिनींना व मातांना अभिमान वाटेल, अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून घडो. आपली नेमणूक ही एक वर्षाच्या कालावधीसाठी असून आपल्या शहर अध्यक्षपदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

(manoj gharat selected as a new dombivali city president from mns chief raj thackeray)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा