'आपलं मंत्रालय’ दिवाळी अंक प्रकाशित

 Pali Hill
'आपलं मंत्रालय’ दिवाळी अंक प्रकाशित

मुंबई - दिवाळीच्या खमंग वाचनानंदाची मेजवानी देणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृह‍पत्रिकेच्या ऑक्टोबर 2016 या दिवाळी विशेषांकाचं प्रकाशन मंगळवारी झालं. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते हा विशेषांक प्रकाशित झाला.

या विशेषांकात मंत्रालयातल्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लिहिलेले अनुभव, कथा, विनोदी लेखन, कविता तसंच नवनवीन पदार्थांच्या रेसिपींचा समावेश आहे. हा विशेषांक माहितीपूर्ण आणि वाचनीय झालाय, असं कौतुक क्षत्रिय यांनी केलं. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातले अधिकारी ब्रिजेश सिंह, अजय अांबेकर, देवेंद्र भुजबळ, अंकाचे संपादक सुरेश वांदिले आणि टीम ‘आपलं मंत्रालय’ही या वेळी उपस्थित होती.

Loading Comments