मंत्रालय पडलं ओस

 Mumbai
मंत्रालय पडलं ओस
मंत्रालय पडलं ओस
मंत्रालय पडलं ओस
See all
Mumbai  -  

मंत्रालय - राज्यात 214 नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सगळेच मंत्री दौऱ्यावर असल्यानं राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आलीय. 27 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार असल्यानं मंत्रालय ओस पडल्याच दिसत आहे. त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातून कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावं लागत आहे.

''शिक्षण खात्यात शाळेच्या कामासाठी मुंबईत आलो होतो, मात्र शिक्षण मंत्रीच नसल्यामुळे आलो पावली परत गावी निघल्याचं नांदेडला राहणारे राकेश पांडेवाड यांनी सांगितलं. तर ''शेतीच्या कामासंदर्भत आलो होतो, पण मंत्रालयात कोणी नसल्याचं समजलं, त्यामुळे मुंबईला येण्यासाठीचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया गेल्याचं'' अकोटचे अतुल जोशी यांनी सांगितलं.

Loading Comments