Advertisement

मंत्रालय ४ मेपर्यंत पूर्णपणे बंद?

मंत्रालयातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत वर्क फ्राॅम होम म्हणजेच घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मंत्रालय ४ मेपर्यंत पूर्णपणे बंद?
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी २९ व ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.

कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाचं काम २९ व ३० एप्रिल रोजी  करण्यात येणार आहे. यामुळे मंत्रालयातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होम म्हणजेच घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.  

हेही वाचा- कोरोनाने मृत पावलेल्या 10 जणांचे मृतदेह अंत्यविधीविना पडून, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मंत्रालयातील एकूण ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढंआल्यामुळे एकच खळबळ माजली होती. कोरोनाबाधित सफाई कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे. सद्यस्थितीत मंत्रालयात ठरावीक कर्मचारीच येत आहेत. तसंच अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही.  शिवाय पुढील काही महिने मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. असं असतानाही ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने नियम पाळण्याकडे काहीजण कुचराई करत असल्याचं पुढं येत आहे.

त्यामुळे सर्व मंत्रालयाच्या निर्जंतुकीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यानुसार २९ आणि ३० एप्रिल रोजी या कामासाठी मंत्रालय बंद राहील. त्यानंतर १ मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे.  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा केल्यामुळे आता मंत्रालयात २ आणि ३ मे शनिवार रविवारी बंद राहील आणि थेट ४ तारखेलाच सुरू होईल असं दिसून येत आहे.

 हेही वाचा- Coronavirus Update: राज्यात पावणेदोन लाख आयसोलेशन खाटा उपलब्ध

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा