Advertisement

रॅलीमुळे वाहतूक कोंडी


SHARES

मुंबई - मराठा रॅलीमुळे रविवारी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सायनपासून निघणारी रॅली नऊ वाजता सुरू होणार होती. मात्र ती रॅली साडेदहा वाजता सुरू झाली.
रॅली सुरु होण्यापूर्वी कोपर्डीमधल्या पीडित मुलीला आणि देशाच्या सीमेवर हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी दोन मिनिटं शांतता ठेवण्यात आली आणि बाइक रॅलीची सुरुवात झाली, या बाइक रॅलीमुळे दादर, लोअर परळच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. तसंच बाइक रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक अगोदरचं वळवण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समितीनं या रॅलीत जवळपास 30 ते 40 हजार बाइकस्वार सहभागी झाले होते, असा विश्वास व्यक्त केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा