Advertisement

'मराठा क्रांती मोर्चा अयशस्वी करण्याचा सरकारचा प्रयत्न'


'मराठा क्रांती मोर्चा अयशस्वी करण्याचा सरकारचा प्रयत्न'
SHARES

सीएसटी - येत्या 14 डिसेंबरला नागपूरला हिवाळी अधिवेशनात मराठा क्रांती मोर्चा धडकणार आहे. सरकार हा मोर्चा दडपण्याचा आणि अयशस्वी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद बुधवारी आयोजित करण्यात आली होती.
मुंबई, पालघर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथून हजारो कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार आहेत. मुंबई नागपूर प्रवासासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे एका विशेष गाडीची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी लागणारी रक्कम मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य भरण्यास तयार होते. मात्र रेल्वे प्रशासनाने विशेष गाडीसाठी स्लिपर कोच उपलब्ध नसून फक्त सेंकड क्लास कोच उपलब्ध असल्याचं सांगितलं. तसंच फूल रेट ट्रेनला सेकंड क्लास कोचसाठी दिल्ली येथून रेल्वभवनमधून परवानगी आणावी लागेल असं सांगण्यात आलं. एकीकडे सरकार डीजीटल इंडियाची घोषणा करत असताना नागपूरला जाण्यासाठी दिल्लीला परवानगी आणावी लागणं ही एक दुर्देवी बाब आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आजपर्यंत शांततेत सुरु असलेल्या मोर्चाला सरकार गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईतील मराठे नागपूरला धडकू नयेत हा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप मराठा क्रांतीच्या सदस्यांनी केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा