SHARE

दादर - मराठा क्रांती मूक मोर्चा संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात 31 जानेवारीला मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमधील प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. मोर्चा शिस्तबद्ध व्हावा यासाठी मराठा क्रांती मूक मोर्चा संघटनेच्या वतीने रविवारी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. दादरच्या शिवाजी मंदिर शाहू सभागृहात सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी, सर्व मावळ्यांनी आणि स्वयंसेवकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावं, असं आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या