मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं दिलंय- मुख्यमंत्री

मराठा आरक्षण अहवालातील शिफारशीनुसार कायदेशीर प्रक्रिया अभ्यासूनच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. हे आरक्षण देताना अोबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

SHARE

''मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देण्यात आलं आहे. ते देखील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता'', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विधेयकांचं समर्थन केलं. मराठा आरक्षणाचं विधेयक विधानसभेच्या दोन्ही सभागृहात कुठल्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबत मत व्यक्त केलं.

समाजात फूट पाडू नये

मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल? यावरून काही जणांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र मराठा आरक्षण अहवालातील शिफारशीनुसार कायदेशीर प्रक्रिया अभ्यासूनच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. हे आरक्षण देताना अोबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आहे. त्यामुळे कुणीही यावरून राजकारण करू, नये असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना अप्रत्यक्षरित्या टोला हाणला.


आंदोलकांवरील गुन्हे मागे

याचसोबत मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनादरम्या गुन्हे दाखल करण्यात आलेल्या २०० आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी घोषणादेखील केली. मराठा आरक्षण विधेयक विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात सर्वसहमतीने मंजूर झाल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार यावेळी मानले.हेही वाचा-

मराठा आरक्षण Live - मराठ्यांनी लढा जिंकला, नोकरी-शिक्षणात १६ टक्के आरक्षण

आमच्यात घुसखोरी नको, ओबीसी कार्यकर्त्यांचं आझाद मैदानात आंदोलनसंबंधित विषय
ताज्या बातम्या