Advertisement

“अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड मारा..”, केदार शिंदेंनी केलं राज ठाकरेंचं कौतुक

महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव "राजा".. अशा शब्दांत केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

“अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड मारा..”, केदार शिंदेंनी केलं राज ठाकरेंचं कौतुक
SHARES

देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस घेण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाचं देशभरातून स्वागत होत असतानाच प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं देखील कौतुक केलं आहे. 

आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या!! "अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड मारा के नाही" राजसाहेब.. आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या!! या काळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव "राजा".. अशा शब्दांत केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.   

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोना लशीच्या तुटवड्यावरून केंद्र विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू असताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवलं होतं. 

हेही वाचा- महाराष्ट्राला पुरेशा लसी मिळणार नसतील तर.., मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

कोरोनाची लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणं, लॉकडाऊन जाहीर करणं महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाला तोंड द्यायचं असेल तर १०० टक्के लसीकरण करणं महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे. म्हणूनच राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचं लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे साध्य करण्यासाठी विशेषतः कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवी', असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं.

महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या, राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात, सीरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी, लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशा मागण्या देखील राज ठाकरे यांनी पत्रातून केल्या होत्या.

त्यानंतर केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस घेण्याची परवानगी देतानाच लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस विकत घेण्याची मुभा देखील राज्य सरकारला दिली आहे.

(marathi film director kedar shinde praised mns chief raj thackeray on covid 19 vaccine )

हेही वाचा- कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा