Advertisement

नाट्य कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

लाॅकडाऊनच्या काळात असंख्य अडचणींचा सामना करणाऱ्या नाट्य व्यवसायातील कलाकारांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट घेतली.

नाट्य कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट
SHARES

कोरोना आणि लाॅकडाऊनच्या काळात असंख्य अडचणींचा सामना करणाऱ्या नाट्य व्यवसायातील कलाकारांनी मंगळवार १० नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत संबंधित कलाकारांनी नाट्य व्यवसायाला भेडसावत असलेल्या समस्या आणि राज्य सरकारकडून असलेली अपेक्षा यावर राज ठाकरेंसोबत चर्चा केली.

वामन केंद्रे, महेश मांजरेकर, प्रशांत दामले, वंदना गुप्ते, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे असे नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक आणि जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर देखील यावेळी उपस्थित होते.  

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५ नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने घेतलेला हा हा महत्वाचा निर्णय आहे. 

मागील ७ महिन्यांपासून राज्यभरातील सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद होती. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचं पालन करणे, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग करणे या अटी पाळण्याच्या  सूचना सरकारने केल्या आहेत. 

मात्र या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासाठी निश्चित नियमावली बनवण्यासोबतच गरजू कलाकारांना मदत, नाट्यगृहाच्या भाड्यातील सवलत आणि करमाफी इत्यादी सवलती राज्य सरकारकडून मिळाव्यात अशी अपेक्षा नाट्य व्यावसायिकांना असल्याचं कळत आहे. 

(marathi theater artist meet mns chief raj thackeray)


हेही वाचा-

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा