Advertisement

महापौर निवासस्थान ठाकरेंच्या कब्जात


महापौर निवासस्थान ठाकरेंच्या कब्जात
SHARES

मुंबई - शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय सुधार समितीने घेतला. प्रशासनाच्यावतीने आणलेल्या प्रस्तवाला सुधार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर केला असला तरी निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे गुरुवारी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत आचारसंहितेचे सावट आहे. मात्र, या निर्णयामुळे महापौर निवासस्थानाची जागा ठाकरे कुटुंबाच्या कब्जात आली आहे.
शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय राज्याच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी मालमत्ता विभागाने सुधार समितीच्या पटलावर ठेवला होता. बुधवारी सकाळी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सुधार समितीती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपले भाग्य आहे. तसेच आचारसंहितेपूर्वी सरकारने निर्णय घेऊन महापालिकेला हा प्रस्ताव पाठवला त्याबद्दल सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. दरम्यान ही बैठक सकाळी अकराची असल्याने शिवसेनेचे अनेक सदस्य या महत्त्वाच्या प्रस्ताव मंजुरीच्यावेळी वेळेत पोहोचू शकले नव्हते.

स्मारकाला किती जागा देणार

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील शिवाजी पार्क येथील भु क्रमांक 501, 502 पैकी आणि भु क्रमांक 1495 येथे असलेल्या महापौर निवासस्थानाचे एकूण क्षेत्रफळ हे 11551.01चौ. मी एवढे आहे. महापौर निवासस्थानाचे बांधकाम हे तळ अधिक पहिला मजला असे एकूण 602.39 चौ. मी एवढे आहे. त्यामुळे ही सर्व जागा बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारणीसाठी स्थापन केलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक या सार्वजनिक न्यासाला महापालिकेच्या मंजुरी दिनांकापासून पुढील 30 वर्षांकरिता प्रतिवर्षी एक रुपया भूइभाड्याने देण्याचा निर्णय सुधार समितीने घेत प्रस्ताव मंजूर केला.
जागा भाडेतत्वावर देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी महापालिका अधिनियम 49(सी) चा वापर करत विशेष सभा बोलावली होती. त्यामुळे यासाठी गुरुवारी तातडीने महापालिका विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. परंतु निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावल्यामुळे संध्याकाळपासून आचारसंहिता लागू झाल्याने गुरुवारी महापालिका सभेपुढे हा प्रस्ताव मंजूर न करता प्रशासनाला मागे घ्यावा लागणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव निवडणूक आयोगापुढे पाठवण्यात येईल आणि त्यांनी मंजुरी देण्यास हिरवा दिवा दाखवल्यास त्याला महापालिकेची मान्यता मिळू शकेल अन्यथा पुढील दोन महिन्यापर्यंत शिवसेनेला प्रतीक्षा करावी लागेल, असे महापालिका विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा