Advertisement

पत्रात हीन दर्जेच्या भाषेचा वापर, महापौरांना अश्रू अनावर

स्त्रियांच्या ज्या भागाचा उल्लेख करु नये अश्या भागांचा उल्लेख यात केला जातोय. मारुन टाकू, विटंबना करू असं किशोरी पेडणेकरांना आलेल्या पत्रात म्हटलंय.

पत्रात हीन दर्जेच्या भाषेचा वापर, महापौरांना अश्रू अनावर
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पत्रात इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरण्यात आली आहे की किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर झाले.

बोलताना त्या म्हणाल्या की, पत्रात हीन दर्जेच्या भाषेचा वापर करण्यात आलाय. कुटंबाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. माझ्या कुटुंबाला काही झालं तर सहन करणार नाही. पत्रात अवयवाची विंटबना कऱण्याची धमकी देण्यात आली आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, आज सकाळी मला धमकीचे पत्र मिळाले. गेले ४० वर्ष आम्ही आमचं चारित्र्य जपलं. पत्रातील भाषा अत्यंत अश्लिल आहे. मी ते पत्र वाचुही शकले नाही. स्त्रियांच्या ज्या भागाचा उल्लेख करु नये अश्या भागांचा उल्लेख यात केला जातोय. मारुन टाकू, विटंबना करू असं पत्रात म्हटलंय.

किशोरी पेडणेकर पत्रांरांशी बोलताना संतापल्या आणि रागाने डोळे पाणावले. ते म्हणाल्या की, मी वयाची साठी ओलांडल्यानंतर मला असे पत्र आलेय. माझ्या नव-याला मारुन टाकू, मुलाला मारु, माझ्या अवयवांची विटंबना करू असं लिहीलंय.

विजेंद्र म्हात्रे या व्यक्तीनं पत्र लिहीलंय. या पत्रावर उरणचा पत्ता आहे. पोस्ट पनवेलचं आहे. मी अश्या गोष्टींना भीक घालत नाही. पण कुठेतरी हे पत्र लिहीणारी व्यक्ती जोडली गेलेली आहे. या पत्राची तक्रार घेऊन आम्ही महिला आयोगाकडे जाणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्यावर्षीही महापौरांना फोनद्वारे आली होती जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. सध्या आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्यात वाद सुरू आहे. या वादानंतरच हे पत्र मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.



हेही वाचा

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील - जितेंद्र आव्हाड

'त्या' प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा