विनायक मेटे हटाव मोहीम सुरू

 Pali Hill
विनायक मेटे हटाव मोहीम सुरू

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांना समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सोमवारी मराठा समाजाच्या काही प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनायक मेटेंना हटवा, अशी मागणी केली. काही मराठा संघटनांना त्यांची कार्यपद्धती पसंत नाही. तरीही त्याविरोधात काही बोललं जात नव्हतं. मात्र, त्यांच्या मातोश्री भेटीनंतर अशा प्रकारच्या हालचाली सुरू होणं, हा योगायोग की आणखी काही अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. दरम्यान, शिवस्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम हायजॅक केल्याप्रकरणीही विनायक मेटे यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती.

Loading Comments