Advertisement

आरे कारशेडला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील


आरे कारशेडला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
SHARES

मुंबई - विरोधकांच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील कारशेडच्या 33 हेक्टर जागेला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी नोटीफिकेशन काढून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे परिसरातील काही योजनांना नो डेव्हलपमेंट झोनमधून वगळण्यात आले आहे. त्यामध्ये मेट्रो 3 च्या कारशेडचाही समावेश आहे. सिप्झ-कुलाबा-वांद्रे या 33 किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प आहे. आरेमधील कारशेडला शिवसेना, मनसे आणि पर्यावरण तज्ञ्ज्ञांनी विरोध केल्याने काही काळासाठी राज्य सरकारने नरमाईचे धोरण घेतले होते. कारशेडमुळे मुंबईतील हरित संपत्ती धोक्यात येईल अशी भिती पर्यावरण तज्ञ्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा