Advertisement

गिरणी कामगारांचा बुधवारी 'इशारा मोर्चा'


गिरणी कामगारांचा बुधवारी 'इशारा मोर्चा'
SHARES

मुंबई - गिरणी कामगारांनी हक्काच्या घरासाठी पंचवीस वर्षे संघर्ष केल्यानंतरही लाखो गिरणी कामगारांचे घराचे स्वप्न काही पूर्ण होताना दिसत नाहीये. 1 लाख 42 हजार गिरणी कामगारांच्या घरासाठी सरकारकडे धोरणच नाही. याआधीच्या सरकारनेही गिरणी कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही आणि आताचेही सरकार तेच करत आहे. तेव्हा आताच्या सरकारलाही गिरणी कामगारांनी धडा शिकवण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया गिरणी कामगार संघटनेच्या नेत्या चेतना राऊत यांनी दिली.

बुधवारी 25 जानेवारीला दुपारी 3 वाजता काळाचौकी येथे इशारा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोफत घरांच्या मागणीसह सर्वच्या सर्व कामगारांना घरे मिळावीत हीच कामगारांची मुख्य मागणी असणार आहे. तर या मोर्चात अधिकाधिक कामगारांनी सहभागी व्हावे असं आवाहनही गिरणी कामगार संघटनेतर्फे करण्यात आलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा