निवडणुकीच्या आखाड्यात भाजपाचा धनाढ्य उमेदवार

 Pant Nagar
निवडणुकीच्या आखाड्यात भाजपाचा धनाढ्य उमेदवार
Pant Nagar, Mumbai  -  

घाटकोपर - मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यात भाजपाने धनाढ्य उमेदवार उभा केला आहे. घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून व्यावसायिक असलेले पराग शहा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण, नगरसेवक पदासाठी उतरलेल्या शहा यांच्याकडे एखाद्या खासदार, आमदारालाही लाजवेल एवढी संपत्ती आहे. पराग शाह यांच्याकडे 689 कोटी 95 लाख 2 हजार 327 रुपये एवढी संपत्ती आहे. शपथपत्रात त्यांनी ही संपत्ती नमूदही केली आहे. या प्रभागात शिवसेनेने सुधाकर पाटील, तर काँग्रेसने प्रवीण छेडांनी उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर भाजपाचे धनाढ्य उमेदवार पराग शहा यांचे आव्हान आहे.

"मी स्वतः कमावलेली ही कष्टाची संपत्ती आहे. निवडून आल्यावर जनतेच्या संपर्कात राहून चांगले काम करणार," असे पराग शहा यांनी स्पष्ट केले.

Loading Comments