Advertisement

राजचं अस्तित्व धोक्यात, म्हणून घेतलं माझं नाव, ओवीसींचा राज यांच्यावर पलटवार

राजकारणात माझ्या नावाला वेगळच वलय आहे. राजकीय भवितव्य डगमगत असणारे जे लोकं माझं नाव घेतात, त्यांना आपसूक प्रसिद्धी मिळते. त्यामुळे राज यांच्यासारख्यांकडून माझं नाव घेतलं जातं. असं ट्विट करत ओवीसींनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

राजचं अस्तित्व धोक्यात, म्हणून घेतलं माझं नाव, ओवीसींचा राज यांच्यावर पलटवार
SHARES

राम मंदिराच्या मुद्दयावरून ओवीसींसारख्या लोकांना हाताशी धरून दंगली घडवून आणण्याचा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच केला होता. राज यांच्या या आरोपाला एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवीसी यांनी उत्तर दिलं आहे. ओवीसी नावाची एक गोळी आहे, जी शरीराला बळ देते. राज ठाकरे याचं राजकीय अस्तित्व धोक्यात आहे. त्यामुळेच त्यांनी माझं नाव घेतल्याचा पलटवार ओवेसींनी केला.


कधी केली होती टीका?

विक्रोळीत भाषण करताना राज यांनी देशात दंगली घडवून आणण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला होता. सध्याचं सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे. राज्यात बेरोजगारी, महागाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तेव्हा या नाकर्त्या सरकारकडून या गंभीर प्रश्नावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा पुढं केला जात आहे.

ओवीसीसारख्या लोकांना हाताशी धरून दंगली घडवून आणण्यासाठी चर्चा सुरू असल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले होते. राज यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेसह अन्य पक्षांकडून त्यांच्यावर टीका झाली.

नावाला वलय

राजकारणात माझ्या नावाला वेगळच वलय आहे. राजकीय भवितव्य डगमगत असणारे जे लोकं माझं नाव घेतात, त्यांना आपसूक प्रसिद्धी मिळते. त्यामुळे राज यांच्यासारख्यांकडून माझं नाव घेतलं जातं. असं ट्विट करत ओवीसींनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. परप्रातीयांना मारहाण करून लोक तुम्हाला गांभीर्यानं घेतील हा समज चुकी असल्याचंही ओवीसींनी म्हटलं आहे.हेही वाचा-

राज्यात दंगली घडवण्याचं षडयंत्र- राज ठाकरे

विरोधकांची बोलती बंद! राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं हिंदीत भाषणRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा