एमआयएमची काँग्रेसवर आगपाखड

 Byculla
एमआयएमची काँग्रेसवर आगपाखड
Byculla, Mumbai  -  

भायखळा - पालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कंबर कसतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर भायखळ्यात एमआयएमच्या वतीने सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर चांगलीच आगपाखड केली.

काँग्रेसने मागील 25 वर्ष फक्त मुस्लीमांचा गैरफायदा घेतला आहे. तसंच या परिसरातील स्थानिक नेत्यांनी या भागाचा विकास केलेला नाही, अश्या काँग्रेस हटवायचं असेल तर आम्हाला निवडुन द्या असं आवाहन एमआयएमचे मुंबई अध्यक्ष अब्दुल शाकिर पटनी आणि वखरुन्नीसा अन्सारी यांनी केलं. तसंच मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल, स्थानिक कार्यकर्ते जावेद जुनेजा यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. तसंच भायखळ्याचे आमदार वारिस पठाण यांनी देखील एमआयएमला बहुमताने विजयी करण्याचं आवाहन इथल्या स्थानिकांना या वेळी केलं. या सभेला हैद्राबाद येथील आमदार अहमेद बलाला आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments