एमआयएम प्रथमच लढवणार मुंबई पालिका निवडणूक

 CST
एमआयएम प्रथमच लढवणार मुंबई पालिका निवडणूक

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्षासह काँग्रेसच्या तोंडाला फेस आणणाऱ्या एआयएमआयएम' पक्ष अद्यापही शांत बसून आहे. पण ही शांतता वादळापूर्वीची ठरणार असून मुस्लिम बहुल विधानसभा निवडणुकीत ते आपले उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे सपा आणि काँगेस यांच्या उमेद्वारांपुढे तगडे आव्हान उभे राहणार आहे.

मुंबई महापालिका 2012 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 'एमआयएम' हा पक्ष निवडणुकीत उतरला नव्हता. परंतु मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले उमेदवार देऊन महाराष्ट्र मुंबईत एंट्री मारली. या निवडणुकीत महाराष्ट्रातच 24 उमेदवार उभे केले. त्यात मुंबईतच 7 जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले. मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, कुर्ला, शिवाजीनगर, चांदीवली, मालाड, धारावी आदी प्रमुख मतदार संघात 'एआयएमआयएम'चे उमेदवार होते. यापैकी भायखळा मतदारसंघातून वारीस पठाण हे एकमेव उमेदवार निवडून आले. परंतु यासर्व ठिकाणी 'एआयएमआयएम'चे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत 'एमआयएम्' चे सुमारे 45 उमेदवार या प्रमुख मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

या पक्षाचा करिष्मा आता होणार नाही, असा दावा सपा आणि काँग्रेस पक्ष करत असला तरी प्रत्यक्षात ओवेसी बंधूचे जहाल भाषणाने मुस्लिम समाज पेटून उठतो आणि 'एआयएमआयएम'ला मतदान करतो हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे 'एआयएमआयएम' ने आपले उमेदवार केले तर ते सपा आणि काँग्रेससाठी घातक आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

'एआयएमआयएम'चे मुंबईतील नेते आणि आमदार वारीस पठाण यांनी किती जागा लढवणार हे सांगण्यास नकार दिला, पण हि निवडणूक एमआयएम लढवणार आहे. लवकारच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे त्यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितले.

Loading Comments