एमआयएमची 1 जानेवारीला नागपाड्यात जाहीर सभा

 Pali Hill
एमआयएमची 1 जानेवारीला नागपाड्यात जाहीर सभा
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - एमआयएम नववर्षाच्या पहिल्या दिवशी निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारीला नागपाडा इथं एमआयएमची जाहीर सभा होणार आहे. या वेळी एमआयएमचे सर्वेसर्वा ओवेसी बंधूही उपस्थित असतील. यासाठी त्यांनी मुस्लिम आणि अल्पसंख्यांक मतदारांची मोर्चेबांधणीही केली आहे.

मुंबईतील 227 पैकी 25 हून अधिक जागांवर एमआयएमचे उमेदवार निवडून येतील, अशा पद्धतीनं एमआयएमने तयारी केली आहे. उमेदवारांची यादीही तयार असून सभेनंतर आठवडाभरात ती जाहीर केली जाईल. एमआयएम संपूर्ण तयारी करून निवडणूक रिंगणात उतरणार आहे, अशी माहिती एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी दिली. भायखळा, मुंबादेवी, वांद्रे, मालाड, व़ड़ाळा, शिवडी, गोवंडी, मानखुर्द या भागांत आमचा उमेदवार जास्त मतानं निव़डून येईल.

Loading Comments