Advertisement

हाजी अली दर्ग्याचे होणार सौंदर्यीकरण

मुंबईतील धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्गाचे (Haji Ali Dargah) नुतनीकरण व सौंदर्यीकरण (Renovation and beautification) आता होणार आहे.

हाजी अली दर्ग्याचे होणार सौंदर्यीकरण
SHARES

मुंबईतील धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्गाचे (Haji Ali Dargah) नुतनीकरण व सौंदर्यीकरण (Renovation and beautification) आता होणार आहे.  नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचं काम  लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaykh) यांनी दिले आहेत. 

मंत्रालयात अस्लम शेख (Aslam Shaykh) यांच्या अध्यक्षतेखाली हाजी अली दर्गा नुतनीकरण व सौंदर्यीकरणासंदर्भात बुधवारी बैठक झाली. यावेळी दर्गाच्या नुतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले. हाजी अली दर्गा येथे दररोज देशविदेशातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. हे एक महत्त्वाचे धार्मिक तसेच पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या परिसराचे नुतनीकरण व सौंदर्यीकरण होणे आवश्यक आहे, असं यावेळी अस्लम शेख म्हणाले. यासाठी आवश्यक परवानग्या तातडीने घ्याव्यात आणि सौंदर्यीकरणात बाधा येणारी या परिसरातील अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याचीही कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. 

या बैठकीला मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह पोलीस आयुक्त नवल बजाज, मुंबई मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन., हाजी अली दर्गाचे विश्वस्त मसूद हसम दादा, रिझवान मर्चंट, सुहेल खांडवानी, जफर शेख आदी उपस्थित होते.

असे होणार सौंदर्यीकरण

-  मुख्य रस्त्यावर भव्य बुलंद दरवाजा उभारणार

- विविध फुलांची झाडे असलेल्या मुघल गार्डनची निर्मिती

- मुघल गार्डनमध्ये प्राचीन काळाची आठवण करून देणारे बाकडे, लाईट यांची व्यवस्था

-  भाविकांसाठी विशेष सोयीसुविधासाठी ‘व्हिजिटर प्लाझा’

-  मुख्य रस्ता ते दर्गा या मार्गाचे नुतनीकरण

- दर्गाच्या मुख्य दरवाजाचे सौंदर्यीकरण



हेही वाचा -

आता ५ डे वीक! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला ५ वर्षे तुरूंगवास




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा