Advertisement

'7 च्या आधी 29 तारीख आहे हे लक्षात ठेवा' - केसरकरांचा राणेंना इशारा


'7 च्या आधी 29 तारीख आहे हे लक्षात ठेवा' - केसरकरांचा राणेंना इशारा
SHARES

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एक जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक लढवण्याबाबत नारायण राणे संभ्रमात असले तरी या निवडणूकीपूर्वी सक्त वसुली संचालनालयाकडून व्यवस्थित तपास होत नसल्याबद्दल उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी येत्या २९ नोव्हेंबरला असल्याची वस्तुस्थितीची माहिती सिंधुदूर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली.


'आता तिघे तुरुंगात जातील' 

मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केसरकरांना राणे यांच्या संदर्भात छेडले असता त्यांनी वरील वस्तुस्थिती सांगितली. राणे यांच्या बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात सक्तवसुली संचालनालय व्यवस्थित तपास करत नसल्यामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी येत्या २९ नोव्हेंबर रोजी म्हणजेच या निवडणुकीपूर्वीच होणार आहे हे लक्षात घ्या, असा अप्रत्यक्ष इशाराच केसरकर यांनी यावेळी दिला.

काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काढलेल्या व्यंगचित्राबाबत केसरकर यांना विचारणा करण्यात आल्यानंतर असेच व्यंगचित्र काढल्यामुळे तामिळनाडू राज्यात एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची आठवण करून देत 'नितेश राणे यांच्या सारख्या छोट्या मुलाच्या प्रश्नांना उत्तर देणे योग्य नसल्याचे'ही केसरकर म्हणाले. 

'मी गृहराज्यमंत्री झाल्यापासुन कोकणातील दहशत कमी झाल्याचा दावा केसरकर यांनी करून, एकाने यापूर्वी एक मासाच मारला असे सांगत अप्रत्यक्ष नितेश राणेंवर प्रहार करत मागच्या वेळी दोन नेते तुरुंगात गेले होते. यावेळी तीन नेते बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जातील' असा टोला तिन्ही राणेंचे नाव न घेता लगावला.

 


हेही वाचा - 

राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा